गुढीचा "बोन्साय'
आनंदाचा, उत्साहाचा उत्सव म्हणजे गुढी पाडवा. मराठी वर्षाचा पहिला सण. तो शुक्रवारी साजरा होणार, होईल पण. पण, दहा वर्षांपूर्वीचा आनंद देणारा नक्कीच नसेल. "हे बघ, माझीच गुढी सर्वात उंच, बघ अशी हाय, नाद असतो आपला,' हे वाक्य बालपणातील. आता हे वाक्य "अरे वा, तुमची गुढी किती लहान आहे ना,' असेच तोंडातून बाहेर पडेल.
उंच झोले घेणारी गुढीचा कधी बोन्साय झालाय हेच आम्हाला कळले नाही. 26 जानेवारी, 15 ऑगस्टला आम्ही तिरंगा फडकवतो, तो निस्सिम प्रेमाने. त्याच प्रेमाने झेंड्याची प्रतिकृती घरात, वाहनात ठेवतो. तशीच प्रतिकृती आता गुढीची बनली आहे. अवघ्या 60, 70 रुपयांत. मग, काय मज्ज्याच की पैसेही बचत आणि आनंदाचाही बोन्साय. गुढीचा बोन्सान संस्कृती कुठे चालली आहे, हे आंतरमुख करणाराच.
No comments:
Post a Comment